भोयरे गांगर्डा सेवा संस्थेच्या व्हा. चेअरमन पदी श्री सचिन रसाळ यांची बिनविरोध निवड

 भोयरे गांगर्डा सेवा संस्थेच्या व्हा. चेअरमन पदी श्री सचिन रसाळ यांची बिनविरोध निवड !

खासदार निलेश लंके यांनी अभिनंदन करत भावी कार्यासाठी दिल्या शुभेच्छा !


पारनेर प्रतिनिधी: श्रीकांत चौरे

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी गुरुवार दि.19 फेब्रुवारी 2026 रोजी भोयरे गांगर्डा सेवा संस्थेची सभा पार पडली. या सभेत श्री सचिन रसाळ यांची व्हा. चेअरमन (उपाध्यक्ष) पदावर सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी श्री सचिन रसाळ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता.

या अर्जास सूचक म्हणून चेअरमन श्री अर्जुन भानुदास रसाळ यांनी तर अनुमोदन मा. चेअरमन माणिक आण्णा पवार यांनी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री राजेश चाबुकस्वार यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले, तर सचिव श्री जासूद यांनी त्यांना सहकार्य केले.

या प्रसंगी संचालक दादासाहेब रसाळ, संजय पवार, प्रदीप रसाळ, प्रतिभा रसाळ यांच्या सह मा. उपसरपंच दौलतराव गांगड, मा. चेअरमन अशोकराव पवार, सरपंच संतोष केकडे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड, मा. ग्राम सदस्य बाळासाहेब सातपुते, शिवाजी रसाळ, अर्जुन गांगड, प्रमोद भोगाडे , शेखर पवार, गणेश रसाळ, नाना केकडे, सुरेश पाडळे तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीबद्दल खासदार डॉ. निलेश लंके, मा. सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच दौलत गांगड तसेच सरपंच रोहिणी गांगड / केकडे यांनी अभिनंदन केले.


चौकट :

गावच्या विकासासाठी नेहमीच अग्रस्थानी असणारे,व भोयरे गांगर्डा गावातील सामाजिक व राजकीय जडणघरणी नेहमीच मोलाचा सहभाग नोंदवणारे नवनिर्वाचित व्हा.चेअरमन यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन. सर्व सभासदांचा विश्वास सार्थकी लावत चेअरमन व व्हा. चेअरमन संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी पारदर्शक व विकासाभिमुख काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत. पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

श्री.दौलतराव गांगड 

( उपसरपंच, भोयरे गांगर्डा )

Post a Comment

0 Comments