.खा.निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली,इंजि.सतीश बापू भालेकर यांची निलेश लंके प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी सर्वांमते प्रेरणादायी निवड केली गेली .

 “कर्तृत्वाच्या तेजाला नेतृत्वाची मुकुटमणी,इंजि.सतीश बापू भालेकर यांची निलेश लंके प्रतिष्ठान पारनेरच्या तालुकाध्यक्षपदी दमदार वर्णी !”



“समाजकारणातून नेतृत्वाची झेप !



पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे



उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि सामाजिक भान जपणाऱ्या कार्यातून राजकारणाला नवी दिशा देणारे इंजि. सतीश बापू भालेकर यांच्या कर्तृत्वाला योग्य तो मान मिळाला असून शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी खासदार निलेशजी लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत हांगा येथे झालेल्या प्रतिष्ठानच्या सर्व सहकारी पदाधिकारी व हितचिंतकांच्या प्रमुख उपस्थितीत, तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.खा.निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली,इंजि.सतीश बापू भालेकर यांची निलेश लंके प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी सर्वांमते प्रेरणादायी निवड केली गेली .



“समाजकारणाची निष्ठा, नेतृत्वाची दिशा "

भालेकरांच्या वाटचालीत परिवर्तनाची भाषा !”

कर्तृत्व, नेतृत्व आणि प्रभावी वकृत्वाचा त्रिवेणी संगम लाभलेल्या या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची पारख लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांनी केली. उच्चशिक्षण व परदेशी अनुभव असतानाही समाजसेवेची प्रेरणा मनाशी बाळगत भालेकर यांनी नोकरी सांभाळत सामाजिक कार्याची धुरा स्वीकारली आणि समाजकारणातून राजकारणाचा मार्ग निवडला.

२०१८ नंतर आयोजित जनसंवाद यात्रेदरम्यान भालेकर यांनी लंके यांच्या टीममध्ये सक्रिय सहभाग नोंदवत वैचारिक, विधायक व संविधानिक कार्यात सातत्याने योगदान दिले. प्रसारमाध्यमांतून पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडताना त्यांनी दूरदृष्टी आणि अभ्यासू वृत्तीचा ठसा उमटवला. २०१९ ची विधानसभा तसेच २०२४ ची लोकसभा निवडणूक यशस्वी करण्यात कार्यकर्त्यांच्या अग्रक्रमात भालेकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते.लोकनेते खासदार निलेशजी लंके यांना प्रेरणास्थान मानून प्रतिष्ठानचे शिलेदार कारभारी पोटभर मेजर यांच्या मार्गदर्शनाखाली ,तालुक्यातील हजारो माता-भगिनींना स्वर्चाने देवदर्शन घडवत

जलसंधारण आणि लोकसहभागाच्या कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. पाणी फाउंडेशन, ‘पाणीदार वडनेर’ उपक्रम व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून वडनेर हवेली हे छोटे गाव पाणीसमृद्ध करण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांना “जलपुरुष” अशी ओळख लाभली आहे. औद्योगिक व आयटी क्षेत्रात तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी या उमद्या युवा नेतृत्वाची निवड होताच जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

समाजकारणातून घडलेले हे नेतृत्व आता विकास, संवाद आणि परिवर्तनाचा नवा अध्याय लिहील, अशी अपेक्षा व्यक्त होत असून इंजि. सतीश भालेकर यांची ही निवड विश्वास, जबाबदारी आणि जनतेच्या आशांचा सन्मान करणारी महत्त्वपूर्ण पायरी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments