कृषी गंगा राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन 2026 चा उद्घाटन समारंभ पारनेर येथे उत्साहात संपन्न !
कै.अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खा .निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कृषी गंगा राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनाचे पारनेर येथे आयोजन !
प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
कै.अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खासदार डॉ. निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कृषी गंगा राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन 2026 चा उद्घाटन समारंभ पारनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर च्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, निलेश लंके प्रतिष्ठान तसेच तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नगरपंचायतीचे नगरसेवक आणि शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
बळीराजाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, कृषीविषयक नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे व कमी दरात कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा या उद्देशाने खासदार डॉ. निलेश लंके गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर येथे कृषी प्रदर्शनाचे सातत्याने आयोजन करत आहेत. आदरणीय कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत उद्घाटन समारंभाला सुरुवात करण्यात आली. सदर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर यांची नेमणूक करण्यात आली.
या भव्य प्रदर्शनात राज्यभरातील विविध कृषी उद्योजकांनी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून नवनवीन कृषी तंत्रज्ञान व उत्पादने सादर केली. प्रदर्शनामध्ये बी-बियाणे, कीटकनाशके, ठिबक सिंचन, सोलर उपकरणे, ट्रॅक्टर व कृषी अवजारे, पशुआहार, नर्सरी, शासकीय योजना, शेततळे कागदपत्रे, दुध काढणी यंत्रे तसेच महिलांसाठी गृहपयोगी वस्तूंची दालने यांचा समावेश होता. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणून दोन फूट आठ इंच उंचीची “राधा” म्हैस हे प्रदर्शनाचे केंद्रबिंदू ठरले.
कृषी उद्योजक व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग या प्रदर्शनाला लाभला असून आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सदर प्रदर्शन १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले असून शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खा. निलेश लंके व संयोजकांकडून करण्यात आले आहे.
◼️ चौकट :
◼️ चौकट :
“कामाचा माणूस म्हणून खासदारांचे नेतृत्व तालुक्यासाठी मार्गदर्शक”
खासदार साहेबांकडे सामान्य जनता कामाचा माणूस म्हणून पाहत आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल अशी भूमिका त्यांनी घेतली असून उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
रा. या. औटी, शिक्षक नेते
◼️ चौकट :
“कष्टकरी जनतेच्या सेवेसाठी सातत्याने धडपड”
आरोग्य शिबिरे, कृषी उपक्रम आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत जनतेची सेवा करण्याचे कार्य सुरू असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण योगदान देत असल्याचा अभिमान आहे.
श्री .मारुतीशेठ रेपाळे, (जेष्ठ नेते )
◼️ चौकट :
“शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी”
विविध कृषी अवजारे, कीटकनाशके व तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत आहे.या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून कृषी प्रेमी शेतकरी बांधव उपस्थित राहत आहेत व पारनेर तालुक्याची शोभा वाढवत आहे ते खरोखर भूषणावह आहे खासदार लंके साहेबांनी शेतकरी बांधवांसाठी आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनास सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . तेंव्हा प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा
सौ. सोनालीताई राजदेव
◼️ चौकट :
“प्रदर्शनातून नव्या उर्जेची प्रेरणा”
साहेबांचे नवीन संकल्पना ही प्रत्येक वेळेस राबवली जाते आरोग्य शिबीर असेल डोळ्याची शिबिर असेल आशा प्रत्येक वेगवेगळ्या संकल्पना ते राबवत असतात आणि त्याच प्रकारे सर्वप्रथम पहिला दिवस असून देखील या ठिकाणी खूप अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते व अजून दोन-तीन दिवस हे प्रदर्शन असताना खूप मोठ्या प्रकारे गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सर्वच पारनेर करांनी व आपल्या सर्वांच्या ओळखीच्या सर्वांना आपण सांगून या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा .
सौ .पुनमताई मुंगसे, महिला युवती तालुकाध्यक्ष
◼️ चौकट :
“सातत्यपूर्ण उपक्रमांचे यशस्वी उदाहरण”
कृषी गंगा प्रदर्शन हे सहाव्या वर्षात पदार्पण करत असून सामाजिक उपक्रमांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे शक्य झाले.खासदार निलेशजी लंके आयोजित भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन या उपक्रमापैकीच आपल्या सर्वांचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे कृषी गंगा राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन या कृषी प्रदर्शनाचे एक सहावं वर्ष आहे म्हणजे कुठलीही गोष्ट करायचं ठरला तर सातत्य जे असतं ते सातत्य आदरणीय लोकनेते निलेश लंके साहेबांनी करायचा असतो आणि हे सर्व करत असताना प्रचंड अशा हातांची मदत असते आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून मदतीतून हे सामाजिक उपक्रम होत असतात कारभारी पोटघन मेजर यांचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे .
सौ. सुवर्णाताई धाडगे, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष
◼️ चौकट :
“नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्या”
शेतकरी व महिलांसाठी विविध स्टॉल उपलब्ध असून सर्वांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.
सौ. राणीताई लंके, माजी जिल्हा परिषद सदस्या
◼️ चौकट :
“तरुण उद्योजकांसाठी सुवर्णसंधी”
महिला बचत गट, तरुण उद्योजक व शेतकऱ्यांसाठी व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे त्याचबरोबर तालुक्यातल्या तरुण उद्योजकांसाठी पण हा खूप सुवर्णमुखी संधी असते कारण त्यांचे व्यवसायाची सुरुवात अशाच छोट्या स्टॉल पासून असते तर महिला बचत गट शेतकरी आणि तरुण उद्योजक यांच्यासाठी खूप मोठी सु
पर्वनी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे .खा. साहेबांच्या नेहमीच चांगले लोकोपयोगी उपक्रम कसे राबवता येतील या साठी आग्रही आसतात .त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण महाआरोग्य यज्ञपण सुरू करत आहोत त्यामुळे पारनेर शहराच्या वतीने पारनेर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक यांच्या वतीने मी नेत्यांचे खूप खूप आभार मानते .
सौ. विद्याताई कावरे, नगराध्यक्षा पारनेर
◼️ चौकट :
“कृषी योजनांची माहिती एका छताखाली”
कृषी यांत्रिकीकरणासह विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणावर निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला असून प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी पर्वणी आहे.या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन कृषी उत्पादने, खते ,औजारे व कृषी विषयक माहिती व थोड्या कष्टात व पैशात भरघोस उत्पन्न कसे घेता येईल याचे प्रत्यक्षीक या प्रदर्शनात उपलब्ध आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शाचा लाभ घ्यावा .
श्री .गजानन घूले, तालुका कृषी अधिकारी
◼️ चौकट :
“शेतीपासून उद्योगापर्यंत मार्गदर्शन”
नवीन तंत्रज्ञान, स्टॉल आणि कृषी अवजारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे.माझ्या तालुक्यातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे विकसित कृषी प्रणाली सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे व शासनाच्या कृषी विषयक सर्व योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी खासदार साहेबांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे नेहमीप्रमाणे याही वर्षी या प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद द्यावा आमची बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हित जोपासणारी संस्था आहे .या प्रदर्शनाच्या व समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा कृषी फायदा होईल याचा विचार करत खासदार साहेबांनी आयोजित केलेले कृषी प्रदर्शन हे खरोखरच कौतुकास्पद आहे
श्री .किसनराव रासकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
◼️ चौकट :
“समारोप दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान”
या प्रदर्शनात नव-नवीन कृषी तंत्रज्ञान व कृषी औजारांची शासकीय योजनांची माहिती शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे, त्यासाठी हे दरवर्षी आपण कृषी प्रदर्शन घेत असतो . पण त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा सहभाग पाहायला मिळत आहे . भविष्यात कृषी प्रदर्शन नगर शहरात घेण्यापेक्षा नगरला पण एक नवीन इंडस्ट्रीज क्षेत्रामध्ये काम करणार त्याठिकाणी प्रदर्शन घेण्याचा माझा मानस आहे .
डॉ . कावरे व अर्जुन भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर जिल्ह्यात झालं नाही असं या पारनेर मध्ये आपण आठ मार्च ते दहा मार्च दरम्यान आरोग्य शिबिर घेणार आहे .22 तारखेला समारोपाच्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अनेकांचा सत्कार आणि त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे . त्यामध्ये उत्कृष्ट शेतकरी असून उत्कृष्ट शिक्षक , उद्योजक,वेगवेगळे क्षेत्रामध्ये काम करणारे लोकांचा त्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे . त्याचबरोबर आपला मावळा व निलेश लंके प्रतिष्ठान त्या संघटनेच्या माध्यमातून आपण दर महिन्याला एका किल्ल्यावर जाऊन संवर्धन स्वच्छता मोहिम करत आसतो . त्या संघटनेच्या माध्यमातून आपण दिवाळीला किल्ले बनवा आणि निबंध स्पर्धेचा आयोजन केलं होतं त्या किल्ले बनवा स्पर्धेमध्ये ज्या ज्या मुलांनी सहभाग घेतला त्यांचे पारितोषके सुद्धा आपण 22 तारखेला त्या ठिकाणी ठेवणार आहोत .
सर्व सहकार्यांनी उत्तम आसे नियोजन केलं या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो . आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे अवाहन करतो .
श्री निलेश लंके
खासदार अहिल्यानगर दक्षिण मतदार संघ



0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra