रक्तदानातून माणुसकीची नाळ जपत ,मुंबईत यश,पण गावाशी नाते अखंडीत ठेवणारे दादा कावरे यांचा अनोखा उपक्रम !
डि. के. लॉजिस्टिक परिवार आयोजित रक्तदान शिबिरात १९८ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग !
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
पारनेर शहरातील बुगेवाडी येथील रहिवासी तथा उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झालेले यशस्वी युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि पारनेर नगरपंचायत प्रभाग क्र. २ चे युवा नेतृत्व श्री. दादा कावरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत ,आयोजित केलेल्या डि. के. लॉजिस्टिक परिवाराच्या भव्य रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १९८ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकीची जाणीव जागवली.
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगात अनेकजण गाव सोडून शहरांकडे वळतात; मात्र काही माणसं अशी असतात की, यशाच्या शिखरावर पोहोचूनही आपल्या मातीतली नाळ कधी तुटू देत नाहीत. श्री. दादा कावरे हे त्यापैकीच एक नाव ठरत आहे. मुंबईतील व्यवसायातून मोठी ओळख निर्माण करत असतानाच त्यांनी आपल्या गावातील माणसांशी जिव्हाळ्याचं नातं कायम जपलं आहे.
डि. के. लॉजिस्टिक या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी केवळ व्यावसायिक यशच मिळवलं नाही, तर अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत सामाजिक जबाबदारीही पार पाडली आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, मदतीचा हात पुढे करणारे आणि समाजासाठी सातत्याने कार्य करणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांनी तालुक्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानलं जातं. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, अनेक कुटुंबांना नवजीवन मिळू शकतं. याच मानवतेच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला युवकांसह सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळाला. “रक्तदान म्हणजे जीवनदान” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.
खासदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या श्री.दादा कावरे यांनी यापूर्वीही अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचे खासदार लंके यांच्यासह मुंबई व परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
गावाकडून मुंबईपर्यंतचा प्रवास करताना स्वतःच्या मातीशी नातं जपणारे आणि समाजासाठी सतत झटणारे युवा नेतृत्व म्हणून दादा कावरे यांच्याकडे आज अनेक युवक प्रेरणास्थान म्हणून पाहत आहेत. रक्तदानासारख्या उपक्रमातून त्यांनी पुन्हा एकदा “समाजासाठी जगणं म्हणजेच खऱ्या अर्थाने यशस्वी होणं” हे दाखवून दिलं आहे.



0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra