कॅप्टन विठ्ठल कोल्हे 34 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त !
सैन्यदलात शिपाई ते ॲडनेरीकॅप्टन या जबाबदार पदावर काम करत झाली सेवापुर्ती !
युवकांच्या मनात राष्ट्रप्रेम व सैन्यदलाबद्दल रुची निर्माण करण्यासाठी उर्वरित आयुष्य खर्ची करणार !
कॅप्टन विठ्ठल कोल्हे
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील सुपूत्र विठठल कोंडीबा कोल्हे हे नुकतेच 31 मार्च, 2025 रोजी सैन्यदालातून ॲडनेर कॅप्टन पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. विठ्ठल कोल्हे यांनी सन 1991 मध्ये सैन दलामध्ये अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून सेवेला सुरुवात केली. वडील शेतकरी असल्यामुळे परिस्थितीची जाण आणि आपल्या काळया मातीचे भान असलेले व्यक्तीमत्च विठ्ठल कोल्हे यांनी भारतीय सैन्यदालामध्ये 34 वर्षाच्या सेवेमध्ये विविध खडतर ठिकाणी सेवा केली आहे. त्याच्या 34 वर्षाच्या कार्यकाळात त्यांना 13 वेगवेगळया युनिटमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. कोल्हे हे उत्कृष्ठ पॅरा जम्पर आहेत त्यांनी लेबनॉन,कम्बोडीया,रशिया सारख्या परदेशातही वेगवेगळया ठिकाणी सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे.
सैन्यदलातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तीन वेळेस उपसैना अध्यक्ष भारतीय सैना यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हे यांना जनरल ऑफीसर दक्षिण कमांड यांच्या हस्तेही सन्मानित करण्यात आले आहे.यांच्या सैन्य दलाच्या यशात तांची धर्मपत्नी सौ.संगिता कोल्हे यांचे महत्वाचे योगदान आहे.एक सैन्यदालातील शिपाई पासून केलेली सुरुवात आज ऑडनरी कॅप्टन पदापर्यंतचा त्याचा प्रवास अत्यंत खडतर राहीलेला आहे.
विठ्ठल कोल्हे हे सैन्यदालातून 31 मार्च 2025 रोजी ऑडनेरी कॅप्टन या पदावरुन बॉम्बे इंजिनिअरी गृप पुणे येथून सेवानिवृत्त झाले आहे.त्यांचे हे कार्य लोणीहवेली गावासाठी व पारनेर तालुक्यासाठी गर्वाची बाब आहे.लोणी हवेली गावातून व परिसरातून ते पहिलेच ऑडनेर कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. नवयुवकांना सैन्यदालात भरती,विविध स्पर्धा परिक्षेसाठी मागदर्शन व नवयुवकांना योग्य दिशा देण्याचे काम विठ्ठल कोल्हे हे सेवानिवृत्ती नंतर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मागदर्शनांचा पारनेर तालुक्यांतील युवकांना निश्चितच फायदा होणार आहे.
कॅप्टनकोल्हे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल आहिल्यानगर जिल्हयाचे भारतीय जनता पाटीचे उपाध्यक्ष सुभाष राव दुधाडे व लोणी हवेली गावाचे सरपंच सौ.जान्हवीताई बाजीराव दुधाडे व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,सर्व सदस्यांनी व लोणी हवेली ग्रामस्थ व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कॅप्टन कोल्हे यांचे अभिनंदन केले आहे.



0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra