जि.प.प्राथमिक शाळा भोयरे गांगर्डा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे !

 जि.प.प्राथमिक शाळा भोयरे गांगर्डा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे !


खा.निलेश लंके यांच्या प्रयत्नातून एक वर्गखोलीसाठी 12 लक्ष मंजुर !


ऐक्य सेवा संस्थेचे चेअरमण तुकाराम वाखारे यांचे माध्यमातून चार वर्गखोल्या पुर्ण !


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे 

            शिक्षणाचा शैक्षणिक दर्जा सांभाळत विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे गांगर्डा या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .भोयरे गांगर्डाचे सरपंच सौ.रोहिणी गांगड /केकडे,

उपसरपंच आदिनाथ गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज डोंगरे, उपाध्यक्ष रवींद्र भोगाडे, सरपंच शिवाजी शिंदे यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

         इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर गीते, देशभक्तिपर गीते, बालगीते, शेतकरी गीत, आदी गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून पालकांची व ग्रामस्थांची मने जिंकली.

          इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम सादर केला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन गाथेतील नाटीकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात.आपल्या मुलांना मोबाईल व बाह्य खाद्यपदार्थांपासून दूर ठेवण्याचा संदेश सदर स्नेहसंमेलनातून पालकांना देण्यात आला.

       शाळेतील सर्व मुले आपली आहेत असे समजून पालकांनी व शिक्षकांनी वागावे, जागरूक राहावे,स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करावे असे आवाहन श्री.तुकाराम वाखारे साहेब यांनी केले.

          जिल्हा परिषदच्या शाळेच्या आज जरी चार नवीन वर्ग तयार असले तरी , वरील मजला चार वर्ग, वॉल कंपाउंड, गेट, वॉशरूम, इ कामे संस्थेच्या व खासदार निलेश लंके साहेब, ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून एक वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा मनोदय मा.उपसरपंच दौलत गांगड यांनी व्यक्त करून आतापर्यंत चार ते पाच लाखाचा लोकसाहभाग जमा झाल्याने देणगीदारांप्रती  कृतज्ञता व्यक्त केली.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती दरेकर मॅडम यांनी केले. तसेच आपल्या बहारदार आवाजाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नाना रसाळ सर,श्री.संतोष लगड सर,आप्पासाहेब रसाळ यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले तर उपस्थितांचे आभार श्री.यादव सर यांनी मानले.तसेच कार्यक्रम संपल्यानंतर तरुणांच्या सहभागातून मिष्ठान भोजन देण्यात आले.

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम.जाधव मॅडम,श्रीम.दरेकर मॅडम, श्रीम.मेमाने मॅडम ,श्रीम. खेडकर मॅडम ,सौ.गायकवाड मॅडम,श्री.यादव सर यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी गावातील आजी-माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व  सर्व सदस्य तसेच गावातील सर्व महिला त्याचबरोबर गावातील तरुण वर्ग,सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनी खिसा रिकामा करत सुमारे एक लाख रुपयांचा भरघोस निधी जमा केला.


चौकट :

ऐक्य सेवा सेंटर या संस्थेने कमिन्स इंडिया प्रा.ली.च्या C S R मधून अद्यावत अशी इमारत बांधली असून लोकसहभाग व संस्थेच्या माध्यमातून वॉल कंपाउंड, वॉशरूम व गेट चे काम चालू आहे.हे भरीव योगदान दिल्याने ग्रामस्थांच्या वतीने संस्थेचे चेअरमन श्री.तुकाराम वाखारे साहेब यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


चौकट :

खासदार निलेश लंके यांच्याकडून प्राथमिक शाळेसाठी एक वर्ग खोलीसाठी 12 लक्ष रु निधी नुकताच मंजुर करण्यात आलेला असुन संस्थेच्या माध्यमातून शाळा इमारत सह, R 0 प्लांट, वृक्षारोपण, गोबर गॅस युनिट, C C T चर यासारखी कामे नियोजनपूर्वक करण्यात आलेली आहेत.त्याबद्दल संबंधित दिणगीदाते व अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.लोकसहभागातून पालक वर्गातून, इतर CSR फंडांतून तसेच खासदार निलेश लंके साहेब यांच्या सहकार्यातून एक वर्षांमध्ये शाळेचे उर्वरित काम पूर्ण करण्याचा आम्ही मनोदय ठेवला आहे .

श्री.दौलत गांगड मा. उपसरपंच भोयरे गांगर्डा

Post a Comment

0 Comments