मुंबई प्रतिष्ठानचा मुंबई नगरीत अनोखा उपक्रम !
खा.लंके यांच्या वाढदिवसानिमित्त होणार भव्य रक्तदान शिबिर !
शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ५ लाख रूपयांचे विमा सुरक्षाकवच देण्यात येणार !
येत्या १० मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठे येथील नीलेश लंके प्रतिष्ठानच्या रविवार दि. ९ मार्च रोजी वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी१० वाजता या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. कामोठे येथील प्लॉट नं.२३ सेक्टर ९ येथील मा. आमदार दत्तूशेठ पाटील हायस्कुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात मोठया संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई येथील नीलेश लंके प्रतिष्ठान हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. अलिकडेच प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवास संपूर्ण मुंबई नगरीतून प्रतिसाद लाभला. मुंबई स्थित पारनेरकरांच्या मदतीसाठी मुंबई प्रतिष्ठान नेहमीच आघाडीवर राहिले आहे. प्रतिष्ठानमुळे मुंबईतील पारनेरकरांना एक हक्काचा खंबीर आधार असून प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येते.
जगभर कोरोना महामारीमुळे भितीचे वातावरण असताना मुंबईस्थित पारनेरकरांना मदतीचा हात देण्यात प्रतिष्ठानचे शिलेदार आघाडीवर होते. कोरोना बाधित रूग्णांना उपचार, रूग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, आवष्यक औषधे उपलब्ध करून देणे, लॉकडाउननंतर मुंबईस्थित पारनेरकरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठीही प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पारनेरकरांना मोठी मदत केली. खा. नीलेश लंके हे कोणत्याही व्यक्तीला मदतीचा हात देण्यासाठी अग्रभागी असतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सहकारीही सामाजिक कामात आपले कर्तव्य बजावत असल्याचे आजवर अनेकदा अनुभवण्यास मिळाले आहे.
▪️चौकट
पाच लाखांचा विमा !
या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ५ लाख रूपयांचे विमा सुरक्षा कवच देण्यात येणार आहे. रक्तदात्यास अजीवन तर त्यांच्या नातेवाईकांना एक वर्षे मोफत रक्त देण्यात येणार आहे. रक्तदानासाठी येताना आधारकार्ड व पॅनकार्ड घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra