कळस विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर खा.लंके यांचे निर्विवाद वर्चस्व !
अध्यक्षपदी शांताराम भागा गाडगे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण गाडगे बिनविरोध !
कळस : प्रतिनिधी
कळस येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शांताराम भागा गाडगे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण भास्कर गाडगे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती संस्थेचे सचिव अंभोरे यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील निर्मल ग्राम कळस येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सर्व सदस्यांना
काम करण्याची संधी मिळावी या हेतूने, संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गलांडे व उपाध्यक्ष विठ्ठल गाडगे यांनी अडीच वर्षाच्या कालावधीनंतर स्वखुशीने राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आर.एस. चाबुकस्वार यांच्या अध्यक्षतेखाली २५/२/२०२५ रोजी निवडणूक घेण्यात आली होती.खासदार निलेश लंके गटाचे अध्यक्ष पदासाठी श्री. शांताराम भागा गाडगे तर उपाध्यक्ष पदासाठी लक्ष्मण भास्कर गाडगे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून , या प्रसंगी याप्रसंगी विठ्ठल गाडगे, ॲड.सूर्यकांत काने, भिमाजी गाडगे, विजय घाडगे, राजाराम मोकाशी, शिवाजी गलांडे, ज्ञानदेव गाडगे, ज्ञानदेव गुंजाळ, सिंधू गाडगे, सुरेखा गाडगे, संगीता कांबळे उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कळसचे माजी सरपंच पांडुरंग येवले यांनी सत्कार करून अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra