सुर्या फाउंडेशन व आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटना यांच्या वतीने केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत खा. नीलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली.

 नॅचरोपॅथी,आयुर्वेदासाठी ठोस पाउले उचला !

खा.नीलेश लंके यांची मागणी !


अहिल्यानगर : प्रतिनिधी 

     नॅचरोपॅथी ही केवळ उपचार पध्दती नसून ती आरोग्यदायी जीवनशैलीचा मुलमंत्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनात नैसर्गिक उपायांचा स्विकार करून आपण निरोगी आणि सुदृढ जीवन जगू शकतो.  नॅचरोपॅथी, आयुर्वेद या क्षेत्रासाठी ठोस पाउले उचलण्याची गरज आहे. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे या दोन्ही उपचार पध्दतीसाठी निश्चित सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला. 

         सुर्या फाउंडेशन व आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटना यांच्या वतीने केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे कॉन्स्टियूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात निसर्गोपचार योग तज्ञ, संसद सस्यांसह राष्ट्रीय भारतीय औषध प्रणाली आयोग कायदा  आणि राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये योग निसर्गोपचाराचा समावेश करावा आणि भारत सरकारदवारे निसर्गेापचार डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकर सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत खा. लंके हे बोलत होते.

  

▪️चौकट


११ हजार रूग्णांवर नॅचरोपॅथीचे उपचार !

कोरोना महामारीमध्ये आम्ही  अकराशे बेडचे कोव्हिड सेंटर सुरू केले होते. त्यावेळी रूग्णांवर नॅचरोपॅथीचेही उपचार करण्यात आले. या उपचारासाठी अनेक लोकांनी विरोध केला. मात्र आम्ही नॅचरोपॅथी उपचार करून सुमारे ११ हजार रूग्णांना कोरोनातून बरे करून घरी पाठविल्याचे यावेळी खा. नीलेश लंके यांनी सांगितले. 


▪️चौकट


विविध आजार तरीही नॅचरोपॅथी उपचाराने रूग्ण बरा !

आम्ही एकूण ३३ हजार रूग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविले. एक रूग्ण असा होता की त्याला विविध प्रकारचे आजार होते. त्याला आम्ही दहा दिवस खाण्यासाठी काही न देता केवळ मोसंबीचा रस दिला. सी व्हिटॅमिनची एक गोळी देण्यापेक्षा एक मोसंबीचा रस देण्यात आला. याच उपचार पध्दतीने या  रूग्णास ठणठणीत बरे करण्यात आले. 

खासदार नीलेश लंके ( लोकसभा सदस्य )


▪️चौकट


बैठकीत करण्यात आलेले ठराव !

भारत सरकारच्या आयुष विभागाने सन २००६ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार निसर्गेापचार करणाऱ्या सर्व निसर्गोपचार्यांना केंद्रीय नोंदणी देण्यात यावी, योग निसर्गोपचार वैद्यकिय प्रणालीचा समावेश राष्ट्रीय भारतीय औषण प्रणाली आयोग कायदा २०२० मध्ये करावा, किंवा योग-निसर्गोपचार वैद्यकीय प्रणालीस स्वतंत्र राष्ट्रीय योग-निसर्गोपचार वैद्यकीय प्रणाली आयोग स्थापन करावा, राष्ट्रीय आयुष मिशनच्या अनिवार्य घटकांमध्ये योग-निसर्गेापचाराचा समावेश करावा, आयुष्यमान भारत योजनेत योग आणि निसर्गोपार वैद्यकीय प्रणालीचा समावेश करावा. योग निसर्गोपचार रूग्णालयांसाठी अनुदान पुन्हा सुरू करावे, सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योगा ॲण्ड नॅचरोपॅथी, मोरारजीभाई देसाई नॅशनल इन्स्टिटयून ऑफ योगा आणि नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ नॅचरोपॅथी या तीन स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी २०१७ पासून रिक्त असलेल्या आयुष मंत्रालयातील सल्लागार हे पद नियुक्त करावे.


▪️चौकट  


योग, निसर्गोपचाराचे महत्व वाढणार !

योग आणि निसर्गोपचार यांचे भविष्यातील महत्व प्रचंड वाढणार आहे, कारण आजकालच्या जीवन शैलीमुळे लोक विविध शारीरीक व मानसिक समस्यांशी सामना करत आहेत. तंत्रज्ञानाची प्रगती होऊनही निसर्गाशी जवळीक साधण्याचा कल भविष्यात अधिक जाणवेल असा सुर या बैठकीतून निघाला. 



Post a Comment

0 Comments