म्हसने फाटा येथे श्री समर्थ मल्टी सर्विसेसचा ऑनलाइन सीएनजी सुविधा ग्राहकांच्या सेवेत दाखल !

 सीएनजी वाहन चालक मालकांची रांगेत उभे राहण्यापासून होणार मुक्तता !


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

             म्हसणे फाटा येथील भारत पेट्रोलियमचे श्री समर्थ मल्टी सर्विसेस या पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या सेवेसाठी प्रथमच सर्व सोयी सुविधांयुक्त सी.एन.जी. ची ऑनलाईन सुविधा सुरु झाली आहे.या पुर्वीही जिल्हयातील प्रथम ऑफलाईन पद्धतीने सी.एन.जी.सेवा देणारे कैलास गाडिलकर यांनी वाढत्या सी.एन.जी. वाहनांमुळे व पुरवठ्याच्या तक्रारी मुळे सीएनजी वाहन मालक चालक व वाहक यांचा ऑफलाइन सीएनजी पंपाच्या कमी प्रेशर व ईतर तांत्रीक अडचणी मुळे ग्राहकांची होणारी ससेहोलपटी मुळे लांबची लांब रांगेत उभे राहावे लागत होते.व त्यांचा किमती वेळ या मुळे व्यर्थ वाया जात होता.त्यामुळे अनेक ग्राहक ऑनलाईन सि एन जी सुविधेची मागणी करत होते.या सर्व गोष्टींचा विचार करत आपण ग्राहकांना या सर्व समस्येतून कसे मुक्त करता येईल ? याचा विचार करत या पंपावर  बी.पी.सी.एल. कंपनीच्या माध्यमातून जिल्हयातील सर्वात मोठा किर्लोस्कर कंपनीचा कॉम्प्रेसर बसविन्यात आलेला आहे. तसेच ग्राहकांना गॅस भरण्यासाठी प्रतिक्षा करावी लागू नये म्हणून आठ नोझल बसविण्यात आले आहे. त्यामुळे एकाच वेळी 8 वाहने सि एन जी गॅस भरु शकतील ,तसेच मोठ्या बस व ट्रक यामध्ये सुद्धा स्वतंत्र सी.एन.जी. भरण्याची सुविधा या पंपावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. 

         सदरची सेवा ही 24 तास सुरु राहणार आसुन. त्यामुळे लांब रांगा लावण्याची वेळ ग्राहकांवर येणार नाही. तसेच मोठा कॉम्प्रेसर असल्यामुळे फुल प्रेशरने गॅस भरला जाणार आहे. त्यामुळे रांगा लावून गॅस भरण्याची प्रतिक्षा आता संपलेली आसुन.या पुर्वीही या पेट्रोल व सि एन जी पंपाची गुणवत्ता व ग्राहक सेवेची दखल घेत ,महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यस्तरीय तसेच अहमदनगर टेरीटोरीचे अनेक पुरस्कार मिळविन्यात कैलास गाडीलकर हे यशस्वी झालेले आहेत.

 

 


      या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून श्रीगोंदा येथील उदयोजक तसेच माऊली एन्टरप्रायजेसचे संचालक ,श्री.चंद्रकांत जठार,भारत पेट्रोलियमचे,श्री.सुधीर कनाला (भारत पेट्रोलियमचे टेरीटोरी मॅनेजर ) (रिटेल) ,मनोजकुमार जाधव टेरीटोरी मॅनेजर (गॅस) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .  

    यावेळी भारत पेट्रोलियमचे इतर अधिकारी श्री.सईद उल खैर , श्री . तरुण गर्ग ,अनिश मुलतक, अमित कुमार राय , पंपाचे डिलर श्री .कैलास गाडीलकर,सौ.शिल्पा गाडीलकर ,पंपाचे मॅनेजर श्री .आवेज सय्यद, उद्योजक श्री.बाळासाहेब भाऊ गाडीलकर ,ज्येष्ठ नागरिक श्री.बाळासाहेब बोधलाजी गाडीलकर (गुरुजी) ग्रामस्थ व ईतर मान्यवर या वेळी उपस्थित होते . 

चौकट :

पेट्रोलियम क्षेत्रात विविध पुरस्काराने सन्मानित !

           ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी भारत पेट्रोलियमची गुणवत्ता अबाधित ठेवत व्यवसाय करणारे युवा उद्योजक कैलास गाडीलकर यांची भारत पेट्रोलियमने दखल घेत बेस्ट CNG रिटेल आउटलेट हिन टेरेटोरी ,सी.एन.जी. चॅम्प महाराष्ट्र आणि गोवा राज्य ,या सह ईतर अनेक पेट्रोलियम क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे .