श्री समर्थ अकॅडेमी संचालित श्री समर्थ पॉलिटेक्निकमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा !


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

      श्री समर्थ अकॅडेमी संचालित श्री समर्थ पॉलिटेक्निकमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यशस्वी उद्योजक श्री.सुभाष खिवराज गुगळे होते.त्यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावून उपस्थितांना राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.या वेळी म्हसणे येथील रहिवासी जेष्ठ नागरिक मा.श्री सूर्यभान शंकर पठारे यांच्यासह संस्थेचे संचालक श्री.कैलास गाडीलकर,महाविद्यालयाचे प्राचार्य देसले डी.डी.,समर्थ इंग्लिश मेडियम स्कूलच्या प्राचार्या शिंदे एम.एस. व सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

         श्री समर्थ इंग्लिश मेडियम स्कूलच्या छोट्या बालकारकरांनी थोर महात्म्यांची वेशभूषा करून त्यांनी समाजाला दिलेल्या मोलाच्या संदेशांची पुन्हा एकदा आठवण करून दिली तर काही विदयार्थ्यांनी साहसी खेळांचे उत्तम प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.




      सदर कार्यक्रमाचे औचित्य साधत नुकत्याच पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .या मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी सौरव गोगडे याने कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन दुसरा येण्याचा मान मिळवला तसेच चैतन्य वडमारे या विद्यार्थ्याने वेट लिफ्टिंग मध्ये दुसरा क्रमांक मिळवला.श्री.सुभाष खिवराज गुगळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या प्रेरणादायी जीवनप्रवासा विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, नियमित व्यायाम आणि सुदृढ आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहावे,असे मार्गदर्शनही त्यांनी केले.संस्थेचे संचालक श्री कैलास गाडीलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत देशसेवेचे धडे दिले तसेच शिक्षण क्षेत्र हे देशसेवेचे उत्तम उदाहरण आहे.व शिक्षणाच्या माध्यमातून आपण देशासाठी सशक्त नागरिक घडवू शकतो असे प्रतिपादन केले . ज्ञान,संस्कार आणि मूल्ये रुजवून समाजाचा विकास घडवणे ही खरी देशसेवा आहे असे प्राचार्य श्री.डी. डी.देसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.त्यानंतर सर्व शिक्षक व शक्षिकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक विभागातील विद्यार्थिनी कु.सिद्धी दरवडे आणि विद्यार्थी कु.कौशिक मुळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. 

         या कार्यक्रमात परेड कमांड संगणक विभागातील विद्यार्थी प्रतीक लगड यांनी अत्यांत शिस्तबद्ध पद्धतीने केली.संगणक विभागातील प्राध्यापिका रासकर एस.बी.यांनी कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने केला.