जि.प.प्राथमिक शाळा देवी भोयरे तुकाईवाडी येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !
पारनेर : प्रतिनिधी
76 वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुकाईवाडी देवी भोयरे ( ता. पारनेर ) या ठिकाणी देशाचा प्रजासत्ताक दिन विवीध उपक्रमाच्या माध्यमातुन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रत्येक प्रजासत्ताक दिनी तुकाईवाडी या ठिकाणी कुठल्यातरी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात येत असते . त्याच प्रमाणे याही वर्षी,विक्रीकर निरीक्षक अधिकारी श्री.सुरेश कारभारी बेलोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या जिल्हा परिषद शाळेत अनोखे उपक्रम राबवले गेले . बाल विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात विविध प्रकारची नृत्ये,पारंपरिक गीते ,महाराष्ट्राची लोककला जतन करत भारुड,गोंधळ गीते , देशभक्तीपर गीते तसेच लेझीम नृत्य सादर करण्यात आले . शाळेमार्फत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना बसवले जाते त्यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्यात कु.शर्वरी अरविंद मगर इयत्ता चौथी व कुमार आर्यन मानेश बेलोटे इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरण्यात आले.
यावेळी माजी सरपंच श्री.दत्तात्रय शंकर मुळे ,ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या सौ.शीतल गणेश बेलोटे ,सौ.रोहिनी वाढवणे,शाळा व्यव्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मनेश बेलोटे, उपाध्यक्ष श्री.महादेव बेलोटे वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष,श्री.मगर साहेब मुख्याध्यापक श्री.शांताराम लंके सर , उपध्यापक श्रीमती नीता बेलोटे ,अंगणवाडी सेविका सौ.हर्षदा संपत वाळुंज सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra