पारनेरचे सुपुत्र ईश्वर वैद्य यांची केंद्र सरकार पुरस्कृत भारत पेट्रोलियम कंपनीच्या मॅनेजर पदावर निवड !
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
पारनेर येथील हवालदार वस्तीवरील सुपुत्र ईश्वर अनिल वैद्य यांची केंद्र सरकार पुरस्कृत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या मॅनेजर पदावर कॅम्पस इंटरव्यू मधून निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पारनेर व शिरूर येथे झाले असून. पदवीपर्यंत शिक्षण महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटीच्या शासकीय महाविद्यालय उदगीर येथून बी टेक इन डेअरी टेक्नॉलॉजी पदवी घेऊन ते उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पदव्युत्तर शिक्षण एम.बी.ए.हे भारतातील नामांकित कॉलेज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), लखनऊ या ठिकाणी झाले आहे. त्यांचे वडील श्री.अनिल वैद्य हे पुणे जिल्हा परिषदेत शिरूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून आई सौ सुरेखा वैद्य या महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल पारनेर शहर व परिसरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra