आरोग्यग्राम जखणगांव येथील प्रयाग राज महाकुंभमेळा यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंना मिळाला शाही स्नानाचा मान !
नगर : प्रतिनिधी
आरोग्य ग्राम जखणगांव ता नगर जि अहिल्यानगर येथुन प्रयाग राज महाकुंभ मेळा यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंना मिळाला शाही स्नानाचा मान.
रात्री उशिरा मौनी अमावस्येला पहाटे कुंभमेळा येथे झालेल्या अपघातानंतर सर्व आखाड्यातील साधुंचे मिरवणुकीने होणारे शाही स्नान मिरवणुकीने न होता साधे पणाने करण्याचा आखाड्याच्या निर्णय आसला तरीही आरोग्य ग्राम जखणगावकरांना शाहिस्नानाचा मान मिळाल्यामुळे समाज परिवर्तनकार डॉ.सुनिल गंधे यांनी सांगितले .
मौनी अमावस्येचे औचित्य साधत बरोबर सकाळी दहा वाजता आरोग्य ग्राम जखणगांव अहिल्यानगर येथून गेलेले सर्व दिडशे भक्तांनी एकाच वेळी प्रयाग राज महाकुंभाच्या संगम घाटावर केले शाही स्नान करण्याची संधी मिळाली त्यामुळे भाविक भक्तांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे .करोडों भक्तांची गर्दी असणाऱ्या अलोट जनसमुदायात अनेक वर्षानंतर आलेल्या कुंभमेळ्यात सहभाग नोंदवायची संधी मिळाली मौनी अमावस्येच्या दिवशी तीर्थावर स्नान करण्याचे भाग्य मिळाले त्यामुळे आमचे आयुष्य धन्य झाल्याची भावना सर्व भक्तांनी व्यक्त केली .
करोडोंच्या गर्दीत दिडशे पैकी सर्व भक्तांनी कुंभमेळ्यातील शाही स्नानासह सर्व उपक्रम पुर्ण करुन आरोग्यदायी यात्रेचा उद्देश सफल केला. यात्रेकरूंनी दिल्या विविध आखाड्यांना भेटी घेतल्या . महान साधुंचे प्रत्यक्ष दर्शन
या आरोग्य महाकुंभ दिंडीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह ,संभाजी नगर,पुणे, मुंबई,बिड,नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र प्रांतातील सर्व अठरापगड जातींच्या एकशे पच्चावन्न भक्तांनी बुधवारी मौनी अमावस्येला प्रयागराज महाकुंभात शाही स्नानाचा आनंद व पुण्य मिळवले.
प्रजासत्ताक दिनाच्या रात्री उशिरा निघुन या यात्रेत आत्तापर्यंत सर्वप्रथम जबलपूर येथे नर्मदेच्या ॠषी घाटावर सायं आरतीचा मान मिळाला.
त्यानंतर वाराणशी नगरीत गंगा घाटावर अंघोळ व काशी विश्वेश्वरांचे दर्शन तसेच मोक्ष घाटावर आपल्या पिता प्रपित्यांच्या मोक्षासाठी विधी करण्यात आले.
त्यानंतर आज एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर आलेल्या प्रयागराज येथे सुध्दा संगम घाटावर शाही स्नान करण्याचा मानही आरोग्य ग्राम जखणगांव च्या यात्रेकरूंना मिळाला.
रात्री उशिरा रामलल्ला दर्शन करण्यासाठी अयोध्या नगरीत राम लल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहे अशी माहिती महाकुंभ आरोग्य यात्रेचे संयोजक व आरोग्य ग्राम जखणगांवचे सरपंच डॉ सुनील गंधे यांनी दिली.
चौकट :
भक्तीचे प्रत्येक असणाऱ्या भगव्या झेंड्याने प्रयागराज येथील वातावरण सर्व भक्तीमय झाले असताना 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत अन्य सर्वांचे झेंडे भगवे असताना आरोग्य ग्राम जखणगांवच्या महाकुंभ दिंडीत तिरंगा झेंडा कुंभमेळ्यातील विशेष आकर्षण ठरले.सर्व भक्त व साधुगणांचा हा कुतुहाचा विषय ठरला.विशेष म्हणजे या तिरंग्याकडे पाहात 11 तासात 22 किलोमिटरच्या या पायी वारीत एकही यात्रेकरू चुकला नाही व सर्वधर्मसमभावा सह राष्ट्र सर्वतोपरी हा राष्ट्रसंदेश महा कुंभमेळ्यात अनुभवा यास मिळाला !
डॉ.सुनील गंधे (लोकनियुक्त सरपंच,आरोग्य ग्राम जखनगाव )



0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra