बाबुर्डी येथे महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी स्पर्धा !
बाबुर्डीकरांकडून जय्यत तयारी !
जिल्हाभरातून स्पर्धक येणार !
पारनेर : प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. ९ मार्च रोजी पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथे घेण्यात येणार असल्याची माहीती सरपंच प्रकाश गुंड व आरसीजी ग्रुपचे अध्यक्ष लाला भोंडवे यांनी दिली.
खा. नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरसीजी ग्रृपने या स्पर्धेसाठी पुढाकार घेतला असून गादी व माती विभागातील स्पर्धा सकाळी ११ वाजल्यापासून घेण्यात येणार आहे. खा. नीलेश लंके व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सकाळी ९ वाजल्यापासून वजने घेण्यास सुरूवात करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तसेच जिल्हा तालीम संघ व पारनेर तालुका तालीम संघाच्या सहकार्याने पार पडणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी घेण्यात येणा-या या निवड चाचणीमध्ये ५७,६१,६५,७०,७४,७९,८६,९२,९७,१२५ या वजनगट स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
▪️चौकट :
विजेत्यांना चांदीची गदा !
या स्पर्धेत गादी व माती विभागात खुल्या गटामध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या मल्लास आरसीजी ग्रृपच्या वतीने चांदीची गदा भेट देण्यात येणार आहे. कुस्ती शौकीनांसाठी पर्वणी असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चाचणी स्पर्धा बाबुर्डी येथे घेण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल बाबुर्डी ग्रामस्थांच्या वतीने खा. नीलेश लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
▪️चौकट
जि.प.शाळेत तयारी !
बाबुर्डीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार असून त्यासाठी गादी तसेच मातीचे मैदान तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नीलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य कामाला लागले आहेत.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra