महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ नांदूरपठार येथे बैठक पार पडली.

 लंके यांच्या प्रचारफेरीत रंगला लेझिमचा डाव ! 

नांदूरपठार येथे राणी लंके यांचे  जल्लोषात स्वागत !


नांदूरपठार : प्रतिनिधी 

    विधानसभा निवडणूकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत लेझिमचा डाव रंगला. लयबध्द लेझिम खेळणाऱ्या नागरीकांनी रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची लक्ष  वेधून घेतले. नांदूरकरांनी केलेल्या या अनोख्या स्वागताना राणी लंके या भारावून गेल्या. 

    शनिवारी उमेदवार लंके यांचे नांदूरपठार येथे आगमन झाल्यानंतर लेझिमच्या डावाबरोबरच पारंपारिक सनई, ढोल व ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूकीने बैठकीच्या ठिकाणी पोहचल्यानंतर राणी लंके यांनी उपस्थितांशी संवाद साधताना येत्या २० तारखेला आपणास मतदान  करण्याचे आवाहन त्यांनी केले.

     यावेळी बोलताना लंके म्हणाल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम  करताना  आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन करून महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपणास विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीची संधी दिली. या संधीचे सोने  करून जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये केलेल्या कामाप्रमाणेच विधिमंडळात आपण काम करून दाखवू  अशी ग्वाही लंके यांनी दिली. 

     निवडणूकीच्या प्रचारानिमित्त मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रचाराची एक  फेरी पुर्ण झाली असून प्रत्येक गावामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खा.  नीलेश लंके यांनी गेल्या पाच वर्षात केलेले काम मतदारांना भावले असून त्याची आठवण करीत विधानसभा निवडणूकीमध्ये  आपणास  साथ देण्याची ग्वाही त्यांच्याकडून देण्यात येत असल्याचे लंके यांनी सांगितले.  

     यावेळी रामदास वलवे, दत्तात्रय चौधरी, भागा बुवा चौधरी, नाना महाराज चौधरी, सोनिया राजदेव, नामदेव देशमाने, मारूती रेपाळे, अर्जुन देशमाने अशोक घुले, मोहनराव रोकडे, सुवर्णा धाडगे, प्रियंका खिलारी, राजूशेठ  चौधरी, रविंद्र राजदेव आदी उपस्थित होते.

▪️चौकट

 एकशिक्की मतदान देणार !

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच नांदूरपठार गावामध्ये कोटयावधी रूपयांची विकास कामे माग लागली असून नांदूरपठारची वाटचाल आदर्श गावाकडे सुरू आहे. खा. नीलेश लंके यांनी गावासाठी मोठया निधी दिल्याने लोकसभा निवडणूकीत नांदूरकरांनी त्यांना भरभरून मते  दिली. आता विधासभा निवडणूकीत आम्ही एकशिक्की मतदान देणार  आहोत. 

रविंद्र राजदेव (मा. सरपंच )

▪️चौकट

महिलांचे पाठबळ !

 महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यासारख्या महिलेस उमेदवारी देत महिला वर्गाला न्याय दिला आहे. विधिमंडळात आपले प्रतिनिधीत्व एक महिला करणार असल्याने मतदारसंघातील प्रत्येक गावांतील महिलांचे  मला पाठबळ मिळत आहे. प्रत्येक बैठकीत महिलांची संख्या लक्षणीय असते. 

राणी लंके (महाविकास आघाडीच्या उमेदवार



Post a Comment

0 Comments