डॉ.श्रीकांत पठारे राणी लंके यांच्या प्रचारात सक्रीय !
खा. नीलेश लंके यांच्या भेटीनंतर पठारे महाविकास आघाडीसोबत !
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
पारनेर-नगर मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून उमेदवारीसाठी उत्सुक असलेले शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. खा. नीलेश लंके यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर डॉ. पठारे यांनी प्रचारात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला.
पठारे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीकडून पारनेर-नगर मतदार संघाची जागा शिवसेनेला हवी अशी मागणी आम्ही पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. उमेदवार म्हणून आपण तयारीही केली होती. मात्र जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहिल्याने शिवसेनेला जागा मिळू शकली नाही. उमेदवारी जाहिर झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर आपण आपली उमेदवारी मागे घेतल्याचे पठारे यांनी सांगितले.
पठारे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुखांशीही चर्चा करण्यात आली. उमेदवारी मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. मतदार संघ मिळावा यासाठी पक्षाकडूनही प्रयत्न केले गेले मात्र महाविकास आघाडीच्या सुत्राप्रमाणे ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला उमेदवारी देण्याचे धोरण ठरलेले आहे. त्यामुळे शिवसेनेला जागा मिळाली नाही. महाविकास आघाडीचा धर्म म्हणून आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन आघाडीतील उमेदवासाठी प्रचार करणार असल्याचे श्रेष्टींकडून सांगण्यात आले. त्यानंतर आपण खा. नीलेश लंके यांच्याशी चर्चा करून प्रचारात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला.
▪️चौकट
सर्व शिवसैनिक लंके यांच्या पाठीशी !
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच शिवसैनिक महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवार राणी लंके यांच्या पाठीशी असून सर्वजण प्रचारात सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीमुळे राणी लंके या विक्रमी मतांनी विजयी होतील.
डॉ.श्रीकांत पठारे ( तालुका प्रमुख शिवसेना )

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra