"श्री समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांकडून 'माहेर' संस्थेत प्रेरणादायी समाजसेवा "
श्री समर्थ अकॅडेमी संचालित श्री समर्थ पॉलिटेक्निक म्हसणेफाटा येथे 'माहेर' संस्थेत पुस्तकदान !
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
श्री समर्थ अकॅडेमी संचालित श्री समर्थ पॉलिटेक्निक म्हसणे फाटा येथील संगणक विभाग आणि प्रथम वर्षाचे विद्यार्थी शिरूर येथील 'माहेर' संस्थेत पुस्तकदान आणि विविध मदत वस्तूंचे वाटप केले. 'माहेर' संस्था ही अनाथ मुलांसाठी काम करणारी एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेत दुर्लक्षित, अनाथ व वंचित मुलांना आश्रय, शिक्षण, आरोग्यसेवा आणि आत्मसन्मानाने जगण्यासाठी योग्य वातावरण पुरवले जाते. संस्थेचा उद्देश समाजातील अशा दुर्बल घटकांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी संस्थेतील मुलांसाठी शैक्षणिक सामग्री, दैनिक उपयोगाच्या वस्तू तसेच लहान मुलांसाठी एक अल्पोपाहाराचे आयोजन केले. या सामाजिक कार्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या कृतीतून समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण केली. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तक आणि वस्तूंचे वाटपच केले नाही, तर संस्थेतील मुलांशी संवाद साधून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या संवादातून मुलांना आधार आणि सहानुभूती मिळाली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या, त्यांच्या सोबत वेळ घालवला. विद्यार्थ्यांनी आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, या भेटीतून त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली आणि समाजातील दुर्बल घटकांप्रती आपले कर्तव्य समजले. संस्थेतील मुलांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. शिक्षकांनी संस्थेतील मुलांसोबत संवाद साधत त्यांना प्रेरित केले, तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व पटवून दिले. शिक्षकांनी संस्थेसाठी शैक्षणिक साहित्य आणि अन्य वस्तूंचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डी. डी. देसले यांचे विशेष मार्गदर्शन आणि पाठिंबा लाभला. संस्थेचे संचालक श्री कैलास गाडीलकर यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना या सामाजिक उपक्रमासाठी प्रोत्साहित केले त्यांनी नेहमीच अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे, ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होईल. संस्थेच्या वतीने या उपकरमाचे कौतुक करण्यात आले. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस. एस. दरोडे आणि प्रा. एम. व्ही. जाधव यांनी प्रयत्न केल.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra