श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशाला देवदैठणचा विद्यार्थी युवराज सतीश यादव विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक !


प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

        श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथे सार्थक वेलफेअर फाऊंडेशन व ओपस साँफ्टवेअर सोल्युशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने आगळे वेगळे विज्ञान प्रदर्शन व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .ह्या प्रदर्शनाला अथर्व पाठक प्रमुख पाहुणे  होते .

     या प्रदर्शनात युवराज सतीश यादव याने पहिला क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांक  मिळवल्याने युवराजला ट्रॅफि  तसेच  १५००० रु बक्षीस देण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील २५शाळा  आणि २००हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले त्याचप्रमाणे ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रदर्शन बघायला आले होते.या वेळी ओपस टेक्नॉलॉजी व ओपस रुरल फाउंडेशनचे CFO निरज कौशिक व टेक्नॉलॉजी हेड मुकेश जोशी तसेच इतर कार्यकारी अधिकारी व अनेक मान्यवर ज्युरी ह्या स्पर्धेचे परीक्षण करायला प्रदर्शनात सहभागी झाले होते. 

    सार्थक वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती नामजोशी,मृणाल राजहंस, सिद्धेश पुरंदरे सर्व अधिकारी वर्ग, कौन्सेलर व सर्व स्वयंसेवक कार्यक्रमाला उपस्थित होते. 

                 चौकट

  स्पर्धेतील विजेते शाळा !

 प्रथम क्रमांक -

 श्री संतश्रेष्ठ निबराज महाराज विद्याधाम प्रशाला दैवदैठण.१५ हजार रु व भव्य ट्रॉफी

 द्वितीय क्रमांक -

 चिंभळे विद्यालय चिंभळे. १० हजार व ट्रॉफी

 तृतीय क्रमांक -

 छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी. ५ हजार व  ट्रॉफी


       चौकट

     युवराज अनेक स्पर्धेत अव्वल !

युवराज याने श्रीगोंदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात  तिसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच  शिरूर शिक्षण प्रशारक मंडळाने आयोजित केलेल्या संस्थांतर्गत  स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवला आहे.आणि आता ढवळगाव येथे आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा लौकिक वाढवला आहे.युवराज हा (यादववाडी ता . पारनेर)येथील आहे. युवराज व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे यादववाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.