लिखाणच माझं सोबती झालय - लेखक स्वप्निल तनपुरे !
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
पारनेर येथील न्यू आर्टस्,कॉमर्स अॕण्ड सायन्स महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालय, पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन व लेखन वाचक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर हे होते.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम महाविद्यालयात दरवर्षी राबवला जाणार असल्याचे डॉ. भाऊसाहेब शेळके यांनी सांगितले. याप्रसंगी लेखक स्वप्निल तनपुरे (शंभर पुस्तकांचे लेखक) यांची प्राध्यापक डॉ. माया लहारे यांनी मुलाखत घेतली. शिक्षक व विद्यार्थी यांनीही लेखकाशी संवाद साधला. यात त्यांनी लेखन प्रवासात आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, इतरांकडून वाचनातून मिळालेली प्रेरणा आणि शंभर पुस्तके लिहिण्याचे ते कसे मानकरी ठरले यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, लेखनच माझं सोबती झालय. याप्रसंगी लेखकाचे वडील श्री. बाबाजी तनपुरे हे सुद्धा उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर म्हणाले, महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाने आयोजित केलेल्या या लेखन वाचक संवाद या कार्यक्रमातून महाविद्यालयातील तरुणाईने एकच आदर्श घेणे आवश्यक आहे. आपण नुसते नोकरी मिळण्यासाठी शिक्षण न घेता. आपल्या परिसरातील लेखकांच्या साहित्यनिर्मितीची प्रेरणा घेऊन लिहिते झाले पाहिजे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर सचिव अॕड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव अॕड.दिपलक्ष्मी म्हसे, खजिनदार जयंत वाघ, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी सर व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास प्रोत्साहन दिले व कौतुकही केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ.दत्तात्रय घुंगार्डे, सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष मा. श्री. विजय डोळ, जेष्ठ पत्रकार मा. मार्तंड बुचुडे, संजय वाघमारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर, विनोद गोळे, सुभाष दिवटे, किरण शिंदे, सुरेंद्र शिंदे व इतर मान्यवर पत्रकार, तसेच श्री. दिनेश औटी, भास्कर खनसे आणि सर्व शाखाप्रमुख, विभागप्रमुख, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागातील नामदेव ठाणगे, ज्योती पतके, नंदिनी चव्हाण, दत्ता पळसकर कामवा व शिका योजनेतील विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. प्रा. संजय कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra