श्री समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल म्हसने फाटा येथे पार पाडला लक्षवेधी स्नेहसंमेलन महोत्सव !

 संस्थाचालक,पालक व सरकारने विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव द्यावा !

आपल्या पाल्याला त्याच्या कुठल्या क्षेत्रात रुची आहे तेथेच व्यासपीठ मिळवून द्यावे !

नानासाहेब जाधव

( प्रांत संघचालक )


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

      सालाबाद प्रमाणे याही वर्षी म्हसने फाटा तालुका पारनेर येथील श्री समर्थ इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये विद्यार्थी व पालक यांच्या समन्वय साधत विविध कलागुणांच्या अविष्कारातून गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी विद्यालयाच्या भव्यप्रांगणामध्ये विद्युत रोषणाच्या व शेकडो पालक मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये "दिनदर्शिका उत्सव सणाचा " या विषयावर १२ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले .

          या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुरेश तथा नानासाहेब अण्णाजी जाधव

( राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे माननीय प्रांत संघचालक )

व त्यांच्या सौभाग्यवती सौ . विमल सुरेश जाधव ( राष्ट्रसेविका समिती सेविका RSS ) या कर्तृत्ववान व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते .


          सालाबाद प्रमाणे या ही वर्षी संस्थेचे संचालक श्री कैलास गाडीलकर हे विवीध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या पाहुण्यास आमंत्रित करत असतात त्याच प्रमाणे याही वर्षी आमंत्रित करत ही परंपरा अखंडित ठेवली.विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री श्री.दादासाहेब काजळे,शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर मेकॅनिकल विभाग प्रमुख श्री.दादासाहेब करंजुले व सौ.छायाताई करंजुले तसेच प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री.अमृताशेठ रसाळ,केंद्रप्रमुख श्री.गवळी साहेब,पंचायत समिती विषय तज्ञ श्री.आंबेकर यांच्यासह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी , पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .



         प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करताना नानासाहेब जाधव यांनी भारतातील शैक्षणिक प्रणालीवर प्रबोधन पर मार्गदर्शन करत विद्यार्थी पालक व उपस्थितांचे मनी जिंकले .आपल्या भाषणात या वेळी अनेक विविध उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .

          विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास झाला तर भारत हा जगाचे नेतृत्व करणार एक महासत्ता राष्ट्र बनण्याचे स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत व त्यात टिकून राहण्यासाठी त्यांना खंबीर बनवण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल झाले पाहिजेत .






         संस्थेचे संचालक कैलास गाडीलकर यांच्या संकल्पनेतून या सामाजिक जाणिवेचे बीज संस्कारातून मुलांच्या मनी उत्तरावर व त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देत स्पर्धेच्या युगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी विविध गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभावाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला .

          हा सांस्कृतीक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ .शिल्पा गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य दिग्दर्शक किरण लोखंडे व पवन नितनवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ,संस्थेचा वार्षिक अहवाल प्राचार्या सौ.माधुरी शिंदे यांनी मांडला तर बी . एड .कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सौ.अरुणा भांबरे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .स्मिता ठुबे यांनी केले तर आभार प्राचार्य दिगंबर देसले यांनी मानले .

चौकट :

शिक्षण प्रणालीचे महत्व समजून सांगताना पारंपारिक शिक्षण पद्धती व गुरुकुल शिक्षण पद्धतीचे विश्लेषण स्वतंत्रपूर्व काळात लॉर्ड मेकॉले हे भारतात आले .व भारतातील सर्व अभ्यास करून ब्रिटिश पार्लमेंट मध्ये त्यांनी त्याचा लेखाजोखा मांडला तो असा की , भारतामध्ये बेकारी व गरीबी आढळून आली नाही .आपल्याला भारतावर राज्य करायचा असेल तर त्या पद्धतीची शिक्षण प्रणाली आपण भारतात चालू केली पाहिजे व त्याचे अंमलबजावणी करत ही शिक्षण प्रणाली भारतात चालू झाली .तदनंतर स्वतंत्र वीर सावरकर यांनी त्यात ब्रिटिश कालीन शिक्षण पद्धतीत बदल करण्यात चे सुचविले होते परंतु ती शिक्षण प्रणाली आजवर तशीच चालू राहिली . तीच शिक्षण पद्धत गेले अनेक वर्षापासून अखंडित चालू आहे .परंतु पालकांनी विशिष्ट प्रकारचा हेतू ठेवून माझ्या मुलाने ह्याच क्षेत्रात करिअर करावे हा हट्ट धरत आहेत .परंतु आजच्या शिक्षण प्रणालीत विद्यार्थ्याला सक्षम बनवायचा असेल तर संस्थाचालक पालक शिक्षक यांनी आपल्या पाल्याला कुठल्या क्षेत्रात रुची आहे त्या क्षेत्रात त्याला करिअर करण्याची संधी दिली पाहिजे व त्या पद्धतीचे त्याला व्यासपीठ मिळवून दिले पाहिजे .अशा पद्धतीने सरकारने शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे !

श्री.सुरेश तथा नानासाहेब अण्णाजी जाधव

(राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे मा . प्रांत संघचालक )