23 व्या राज्यस्तरीय पारनेर मॅरेथॉन स्पर्धेचे 18 जानेवारी ला आयोजन !
नागेश्वर मित्र मंडळाचा उपक्रम -- पाणी वाचवा, जीवन वाचवा चा संदेश !
पारनेर :प्रतिनिधी
नागेश्वर मित्र मंडळ पारनेर वतीने आयोजित राज्यस्तरीय पारनेर मॅरेथॉन स्पर्धा शनिवारी 18 जानेवारी ला आयोजीत केल्याची माहिती मंडळाचे प्रमुख अश्विन कोल्हे,राजेंद्र म्हस्के, सतिष म्हस्के,नजीर तांबोळी , कल्याण थोरात,यांनी दिली. स्पर्धेचे यंदा 23 वे वर्ष आहे.
नागेश्वर मित्र मंडळाचे वतीने स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पारनेर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.शनीवारी 18 जानेवारी ला पारनेर बाजारतळ मधून स्पर्धा प्रारंभ होणार आहे.स्पर्धा साठी सह्याद्री एजन्सी चे प्रमुख अश्विन कोल्हे, नगरपंचायत पारनेर , गौरव उद्योग समूहाचे प्रमुख अर्जुन भालेकर,जय माता दि उद्योग समूहाचे प्रमुख मारूती रेपाळे, प्रसिद्ध सी.ए. कौस्तुभ काकडे असोसीएटस, मातोश्री कन्स्ट्रक्शन चे प्रताप अंबुले,स्व.राजाभाऊ देशमुख मित्र मंडळ,गायकवाड आयुर्वेदिक औषधी , पारनेर पंचायत समिती शिक्षण विभाग, सह प्रायोजक राहणार आहेत.स्पर्धा साठी खुल्या गटात पुरूष साठी असून यात राज्यातील स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. पहीली ते चौथी मुले,मुली, पाचवी ते सातवी मुले मुली आठवी ते दहावी मुले मुली असे सहा गट असुन या शालेय गटात फक्त पारनेर तालुक्यातील स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के,कल्याण थोरात,गणेश कावरे, अश्विन कोल्हे, धीरज महांडुळे यांनी सांगितले.स्पर्धा साठी 12 जानेवारी पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन मंडळाचे प्रमुख नजीर तांबोळी,डॉ नरेंद्र मुळे, योगेश वाघ,प्रमोद गोळे, विजय इंगळे,अनिकेत औटी, उदय शेरकर, दत्ता शेरकर, सचिन शिंदे, नरेंद्र शिंदे, वैभव बडवे,नवनाथ गाडगे, राहुल सोंडकर, आकाश जोशी, सुहास मोढवे,वैभव पठारे, दिगंबर शिंदे, गणेश डेरे, इंद्रजित देशमुख, सतिष इंगळे,सुनील कावरे,आकाश शेळके, प्रमोद शेळके, संतोष भोर,प्रा तुषार ठुबे, , वैभव पानसरे, दत्ता वाटमारे, सारंग बोरूडे, , किरण शिंदे, , सुभाष कावरे, वैभव पानसरे,समृद्ध मुळे,प्रा संकेत ठाणगे ,वेदांत शिंदे,प्रशांत शेरकर,सुयश सातपुते, स्वप्नील राऊळ,सागर नवले तुषार औटी, ईश्वर बोरूडे, वैभव मापारी,यांनी केले आहे.
कोट
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पेन्शन मधून विजेत्यांना ट्राफी
पारनेर मॅरेथॉन स्पर्धा गेलया 22 वर्षे पासून सुरू असून स्पर्धा तील बक्षीस विजेत्यांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या निवृत्ती वेतन मधून दरवर्षी ट्राफी देण्यात येते. स्पर्धा साठी पोलिस निरीक्षक समीर बारवकर, पारनेर महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना पथक, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज परिचारीका पथक, पारनेर ग्रामीण रूग्णालय, 108 रूग्णवाहीका आदींनी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra