पारनेर शहरात शनिवारी चंपाषष्ठी महोत्सव होणार संपन्न !

भाविक भक्तांसाठी प्रसिद्ध आमटी भाकरीच्या महाप्रसादाने होणार चंपाषष्ठी साजरी !


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

शहरातील पोलिस ठाण्या जवळ असणारे प्रसिद्ध खंडोबा मंदीरात शनिवारी 7 डिसेंबर ला चंपाषष्ठी महोत्सव चे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध आमटी भाकरी चा महाप्रसाद चे नियोजन केले ची माहिती देवस्थान चे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी दिली.

  पारनेर मधील प्रसिद्ध पावन खंडोबा मंदीरात दरवर्षी चंपाषष्ठी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी शनिवारी सात डिसेंबर ला चंपाषष्ठी महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी दहा ते बारा जागरण गोंधळ  व सायंकाळी सहा ते आठ हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे किर्तन होऊन नंतर आमटी भाकरी चा महाप्रसाद देण्यात येणार आहे. या सोहळ्याला भाविकांची प्रत्येक घरातुन पाच ते दहा भाकरी आणुन महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश औटी, विशाल शिंदे, सतिश औटी, कल्याण थोरात, प्रमोद गोळे,सतिष म्हस्के, हर्षवर्धन औटी, समीर शेख,उदय शेरकर यांच्या सह देवस्थान मंडळाने केले आहे