क्रीडा संकुलांसाठी ४५ कोटी निधीची मागणी !
मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना खा. नीलेश लंके यांचे पत्र !
नगर : प्रतिनिधी
नगर शहरातील वाडिया पार्क साठी वीस कोटी तर पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड व शेवगांव या तालुक्यांतील क्रीडा संकुलांसाठी प्रत्येकी पाच कोटींच्या निधीची मागणी खा. लंके यांनी केली असून हा निधीही मार्च महिन्यात मंजुर करण्याची ग्वाही केंद्रीय श्रम, रोजगार, युवा कार्यक्रम तथा खेळ मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
नगर शहरातील वाडिया पार्क तसेच विविध तालुक्यांतील क्रिडा संकुल किंवा त्यात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खा. लंके यांनी नवी दिल्ली येथे खा. भास्कर भगरे यांच्यासह मंत्री मांडविया यांची भेट घेतली. यासंदर्भात लंके यांनी मांडविया यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, नगर शहरातील वाडिया पार्क हे जिल्हयातील एकमेव प्रमुख क्रीडा संकुल आहे. या संकुलामध्ये अनेक सुविधांची आवष्यकता असून काही सुविधांअभावी विस्तृत आणि मोठे क्षेत्रफळ असूनही या संकुलापासून खेळाडू उपेक्षित राहत आहेत. वाडिया पार्क विकसीत करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास एक गुणवत्तापुर्ण क्रीडा संकुल उभे राहील. त्या माध्यमातून विविध खेळांना प्रोत्साहन मिळू शकेल असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला आहे.
नगर शहराबरोबरच पारनेर,श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगांव या तालुक्यांमधील क्रीडा संकुलांमध्येही विविध सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे क्रीडा संकुल असूनही ग्रामीण भागातील खेळाडूंना त्याचा लाभ घेता येत नाही. मंत्री मांडविया यांनी या मागणीचा विचार करून निधी मंजुर करण्याची मागणी खा. लंके यांनी यावेळी केली.
खा. लंके यांच्या मागणीचा विचार करून येत्या मार्च महिन्यात ४५ कोटींच्या निधीला मंजुरी देण्याची ग्वाही मंत्री मांडविया यांनी दिल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra