नगर तालुक्यातील देहरे परिसरात राणीताई लंके यांच्या प्रचाराचा धडाका !
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सरसावले, महिलांची उपस्थिती लक्षणीय !
नगर तालुका (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील देहरे परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.राणीताई निलेश लंके यांच्या प्रचाराचा महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या धुमधडाक्यात शुभारंभ केला असून परिसरातील गावे, वाड्या वस्त्या पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या प्रचार शुभारंभ प्रसंगी खासदार निलेश लंके यांची पुतणी अक्षदा लंके, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नगर तालुका अध्यक्षा डॉ.मधु कदम, निर्मला काळे, शुभांगी काळे, वर्षा काळे, माजी पंचायत समिती सदस्य व्ही.डी. काळे पाटील, अरुण लांडगे पाटील, चेअरमन यशवंत काळे, निलेश लंके प्रतिष्ठान देहरे अध्यक्ष डॉ.अनिल लांडगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नगर तालुका उपाध्यक्ष महेश काळे, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुनील बालवे, ग्रामपंचायत सदस्य रमेश काळे, निवृत्त तहसीलदार श्री. डावरे, माजी चेअरमन हरीदास करंडे, राष्ट्रवादीचे राहुल जाधव, ज्येष्ठ नेते तथा सोसायटीचे संचालक गणपत काळे, ग्रा.पं. सदस्य किरण लांडगे, अजित काळे, अनिल चोर, सादिक शेख, नवनाथ करंडे, माजी उपसरपंच अनिल करंडे, युवा नेते प्रदीप करंडे, उद्योजक सुरेश धनवटे, सुहास गोपाळे, सोपान करंडे, आदिनाथ करंडे, हरिभाऊ करंडे, माजी चेअरमन कैलास डावरे, असलम शेख, अल्पेश शेख शाहरुख शेख, सोसायटीचे माजी संचालक साईनाथ काळे, अनिल पंढरीनाथ लांडगे, सोपान काळे सोसायटीचे संचालक डॉ.जाधव, राजेंद्र बाळासाहेब लांडगे, विकास धोत्रे, उत्तम घागरमाले, नासिर शेख, गणेश जाधव, नवनाथ जाधव, नितीन भांबळ, ज्ञानेश्वर काळे, अक्षय उर्फ मुन्ना लांडगे, अजय आंग्रे, रामदास करंडे, रावसाहेब चोर, प्रकाश पाखरे, बाळासाहेब जेजुरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन जेजुरकर, रघुनाथ करंडे, माजी सरपंच नामदेव काळे, चंद्रभान काळे, सोपान काळे, सोमनाथ तांबे, पिंटू लांडगे, प्रा. सुहास पाखरे, माजी ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर काळे, माजी उपसरपंच भाऊ काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम काळे, बी.जी. लांडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
खा.निलेश लंके यांचे देहरे परिसरावर विशेष प्रेम असून या परिसरातील नागरिकांच्या सुख दुखात ते नेहमी धावून येत असतात, या परिसरातील विकास कामांसाठी त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. राणीताई लंके यांना सर्वाधिक मताधिक्य देहरे परिसरातून देवू असा विश्वास यावेळी माजी पंचायत समिती सदस्य व्ही.डी. काळे पाटील यांनी व्यक्त केला.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra