पारनेर शहरातील आंबेडकर स्मारकाचा १ कोटी १० लाख रुपयांचा निधी पालकमंत्री विखे यांनी अडवला !
राज्यात प्रथमच डॉ.आंबेडकरांच्या स्मारकास विरोध करणाऱ्यां विखेंना पारनेरची जनता माफ करणार नाही !
हिमानी नगरे (नगरसेविका पारनेर )
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
पारनेर ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले व पारनेर या छोट्याशा गावाला शहराचे स्वरूप प्राप्त झाले .खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत आल्यानंतर लंके यांनी करोडो रुपयाचा निधी शहरासाठी दिला परंतु राजकीय वय मनस्यातून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी .प्रत्येक कामात आडगाव करण्याचा प्रयत्न केला पारनेरची पाणी योजना अंतिम टप्प्यात असतानाही आपल्या पदाचा गैरवापर करत ही पारनेरची जीवनदायी समजली जाणारी योजना अडवण्यात पालकमंत्री यशस्वी झाले तसेच पारनेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आलेला १ कोटी १० लाख रुपयांचा निधी पालकमंत्री विखे यांनी जाणीवपूर्वक अडवला .अथक प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे राहावे म्हणून पारनेरचे माजी उपसरपंच बाळासाहेब नगरे यांच्यासह पारनेर शहरातील विविध मान्यवरांनी पाठपुरावा केल्यानंतर खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात आली परंतु पालकमंत्र्यांच्या एका सहीमुळे हे काम रोखले गेले.
भारतीय घटनेचे शिल्पकार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्मिता जतन करत ,या महामानवाचे तालुकास्तरीय एक भव्य स्मारक उभे करण्याचा मानस असताना महाराष्ट्रात असं कुठेच घडलं नसेल जिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले.हे खरोखरच खेदजनक आहे .तांत्रिक अडचणीमुळे काही लोकांच्या आडमुठ्या धोरणामुळे जागेचा प्रश्न मार्गी लावून लवकरात लवकर आंबेडकर स्मारकाचं काम चालू व्हावे हीच अपेक्षा सर्व पारनेर करांची आहे . आंबेडकर स्मारकाचं काम न झाल्यामुळे स्मारकात होणारी ६० लाखाची अभ्यासिका ही बाजारतळ येथे सुरू करावी लागली.सध्या बाजारतळाचे सुशोभीकरण, पेविंग ब्लॉक,वॉल कंपाऊंड, पानपोई असे अनेक काम चालू आहे त्यासाठी 60 लाख रुपये चे काम चालू आहे. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी २५ गुंठे प्रभाग ९ मध्ये ७/८ भुयारी गटारीसाठी २३,३२,७५० रुपये. आणि ८७,७६,००० रुपये रस्ते काँक्रिटीकरण काम पूर्ण झालेआहे. सोनवणे-गायकवाड चावडी सुशोभीकरणासाठी १७ लाख रुपयाचे आरो वॉटर प्युरिफायर प्लांटला निधी,हॅलोजन साठी २५ लाख,महिला जींमसाठी १२ लाख, नाना नानी पार्कला ही निधी जामगाव रोड साठी ५ कोटी निधी सध्या तेही काम चालु आहे.लोणी रोड साठी ५ कोटी निधी तेही काम चालु आहे.जामगाव रोड लोणी रोड रस्त्याचे काम चालू आहे. प्रभागामध्ये १६ ते १७ कोटींची कामे मार्गी लागली. खासदार निलेश लंके साहेबांनी भरघोस निधी माझ्या प्रभागाला दिला .ही माहिती प्रभाग क्र .नऊच्या नगरसेविका हिमानी नगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली .

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra