प्राचार्या डॉ.कुंदा कवडे यांना नेटच्या परीक्षेत घवघवीत यश !

 प्राचार्या डॉ.कुंदा कवडे यांना नेटच्या परीक्षेत घवघवीत यश !

अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या डॉ.कवडे यांचेवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव !


 अळकुटी : प्रतिनिधी

       शैक्षणिक क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवणाऱ्या व विद्यादानाच्या क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असणाऱ्या डॉ .कुंदा कवडे या आळकुटी येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,येथे प्रभारी प्राचार्या तथा मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत .

डॉ.कुंदा कवडे या मराठी विषयाकरिता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या युजीसी नेटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आसुन डॉ.कुंदा कवडे यांनी अळकुटी महाविद्यालयात गेली १९ वर्षे अध्यापनाचे कार्य केले आहे.या दरम्यान त्यांनी अंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय पातळीवरील तीसहून अधिक संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत. यापूर्वी त्या सेट परीक्षाही उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे पी.एच.डी.ची पदवीही संपादन केली आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 

         कवडे यांच्या या यशाबद्दल,सशस्त्र सीमा बल मध्ये प्रशिक्षक मुख्य आरक्षी संदीप तांबे यांच्यासह पारनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी डॉ. कुंदा कवडे यांचे अभिनंदन करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या !



Post a Comment

0 Comments